Baramati | जय पवार बारामतीच्या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरणार ? अजित पवारांनी केलं स्पष्ट म्हणाले, मी पण ती चर्चा ऐकली पण..!

 


बारामती | प्रतिनिधी 

            राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून सुरू होती. याबाबत आज खुद्द अजित पवारांनी भाष्य केलं आहे. आज अजित पवारांनी बारामतीत पत्रकार परिषदेवेळी बोलताना याबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे. जय पवार हे निवडणूक लढणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.



मी पण ती चर्चा ऐकली, पण...

       जय पवार बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार आहेत का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, मी पण ती चर्चा ऐकली, मला आज पण बरेच जण म्हणाले परंतु तसं काही होणार नाही. असं म्हणत अजित पवारांनी जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.



Post a Comment

0 Comments