सोमेश्वरनगर | विजय लकडे.
आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निंबुत पंचायत समिती गणातून एक तरुण चेहरा पुढे येत आहे — स्वप्निल शहाजीराव जगताप. समाजकारणाची कुटुंबपरंपरा, सर्वपक्षीय जनसंपर्क आणि जनतेशी असणारा आपलेपणाचा संवाद यामुळे स्वप्निल जगताप हे नाव सध्या चर्चेत आहे.
बारामती तालुक्यातील पश्चिम भागात शिवसेनाशिंदे गटाचा हा युवा कार्यकर्ता केवळ राजकारणातच नव्हे तर समाजकारणातही नेहमी पुढे असतो. दिवाळीच्या काळात गरजू कुटुंबांना साखर वाटप, बांधकाम कामगारांना शासन योजनेतून भांडी वितरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून देणे, तसेच सामान्य नागरिकांना वैद्यकीय मदत अशी अनेक समाजोपयोगी कामे त्याने केली आहेत.
आयुष्यमान भारत कार्ड, रेशन कार्ड, बांधकाम कामगार योजना अशा जनजीवनाशी निगडित योजनांची अंमलबजावणी करताना स्वप्निल जगताप नेहमीच आघाडीवर राहतो. परिसरातील छोट्या-मोठ्या प्रश्नांवर तो तत्परतेने काम करतो, हेच त्याच्या लोकप्रियतेचे गमक आहे.
समाजसेवेची परंपरा, सर्वपक्षीय सुसंवाद, आणि परिसरातील प्रभावी संपर्कजाळ्यामुळे येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत स्वप्निल जगताप नक्कीच आपली वेगळी छाप सोडतील, असा जनतेत विश्वास व्यक्त केला जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून कार्य करणारा हा तरुण शिलेदार बारामती तालुक्यात आपले वेगळेपण कसे सिद्ध करतो, हे येणारा काळच सांगेल.





0 Comments