सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कै. शिवाजी गणपतराव कारंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन झालेल्या शिवा काका कारंडे फाऊंडेशनच्या वतीने करंजेपूल, सोरटेवाडी, होळ, सदोबाचीवाडी, सस्तेवाडी, कोऱ्हाळे, लाटे व काबळेश्वर या गावांच्या संयुक्त विद्यमाने “किल्ले बनवा स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेसाठी तब्बल ₹२५,००० चे पहिले बक्षीस ठेवण्यात आले होते. तसेच दुसरे बक्षीस ₹१०,०००, तिसरे ₹५,०००, चौथे ₹२,००० व पाचवे ते अकरावे प्रत्येकी ₹१,००० अशी बक्षिसे देण्यात आली. नुकताच पार पडलेला बक्षीस वितरण सोहळा उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाला सोमेश्वरचे संचालक ऋषी गायकवाड, सरपंच वैभव गायकवाड, प्रा. अमोल जगताप, उद्योजक किरण गायकवाड, बागायतदार विशाल धुमाळ, युवा नेते अमोल वायाळ, संग्राम होळकर, उपसरपंच किरण कदम तसेच होम मिनिस्टर फेम आकाश वाघमारे उपस्थित होते. सूत्रसंचालन बाबूलाल पडवळ यांनी केले.
फाउंडेशन गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून महिला बचत गट, विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवत आहे. संस्थापकांनी सांगितले की, “कै. शिवाजी गणपतराव कारंडे यांच्या आदर्शातून प्रेरणा घेत आम्ही शाळा व मंदिरासाठीही जागा बक्षीस पत्र दिली असून, सामाजिक कार्य अधिक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.”
फाउंडेशनच्या या उपक्रमांचे ग्रामीण भागात कौतुक होत असून, सामाजिक परिवर्तनासाठीचे त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरत आहे.




0 Comments