BREAKING NEWS | माळेगाव नगरपंचायत निवडणूक : कट्टर विरोधकांची धक्कादायक युती, राजकारणाला नवा ट्विस्ट!

 

माळेगाव : प्रतिनिधी 

                 राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत चुरशीची लढत लढवणारे अजित पवार आणि रंजन तावरे आता मात्र एकाच पॅनेलवर उभे ठाकले आहेत. नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या ‘मनमिलना’ने माळेगावच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.



पूर्वी कारखाना निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दोन्ही गट अखेर एकत्र आले असून, अजित पवार गट १२ जागा + नगराध्यक्ष पद, तर रंजन तावरे गटाला ६ जागा असा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. या अनपेक्षित युतीने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.



माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीसाठी ही आघाडी अधिकृतरीत्या घोषित करण्यात आली. या घोषणेतलं सर्वात आश्चर्यकारक समीकरण म्हणजे — कट्टर प्रतिस्पर्धी असलेले रंजन तावरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एका मंचावर!


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युतीपासून दूर राहणार असून स्वतंत्र उमेदवार उतरवले आहेत. त्यात नाराज कार्यकर्ते आणि काही अपक्षही मैदानात उतरल्यानं त्रिकोणी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.


उमेदवारांची यादी जाहीर


१) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) — १२ उमेदवार


प्रभाग ३ – संगिता जाधव

प्रभाग ५ – सोनाली रासकर

प्रभाग ७ – शितल खरात

प्रभाग ८ – वृषाली तावरे

प्रभाग ९ – अॅड. गायत्री तावरे

प्रभाग १० – भाग्यश्री कदम

प्रभाग १२ – शशिकांत तावरे

प्रभाग १३ – अविनाश तावरे

प्रभाग १५ – जयदीप दिलीप तावरे

प्रभाग १६ – प्रांजली येळे

प्रभाग १७ – साधना वाघमोडे

नगराध्यक्ष पद – सुयोग सातपुते


२) रंजन तावरे गट — ६ उमेदवार


प्रभाग १ – प्रतिभा सस्ते

प्रभाग २ – गौरव भुंजे

प्रभाग ४ – लियाकत तांबोळी

प्रभाग ६ – जयपाल भोसले

प्रभाग ११ – जयदीप विलास तावरे

प्रभाग १४ – प्रमोद तावरे


निवडणुकीत रंगत वाढली!


स्वतंत्र उमेदवार, अपक्ष आणि अजित पवार–तावरे पॅनेल यांच्यातील युती तर शरद पवार गटाचा स्वतंत्र लढा या मुळे निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल १० अर्ज दाखल झाले असून विरोधकांचा अधिकृत उमेदवार दोन दिवसांत जाहीर होणार आहे.


माळेगावच्या पहिल्या नगरपंचायत निवडणुकीत अशा धक्कादायक समीकरणांमुळे राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे!

Post a Comment

0 Comments