सोमेश्वरनगर – प्रतिनिधी.
३१ ऑक्टोबर २०२५ रोजी एस. डी. सह्याद्री पब्लिक स्कूल & ज्युनियर कॉलेज, वाघळवाडी (ता. बारामती) येथे जिल्हास्तरीय योगा स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी व आंतरराष्ट्रीय खेळाडू जगन्नाथ लकडे, छत्रपती पुरस्कार विजेती रेखा धनगर, तसेच आंबेगाव तालुका क्रीडा अधिकारी पालवे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत एस. डी. सह्याद्री विद्यालयातील मुला–मुलींनी विविध प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
विजेते विद्यार्थी:
U-14 मुले (आर्टिस्टिक पेअर): समर्थ सुरेश पाटील व वैभव विश्वास भालेकर – प्रथम क्रमांक
U-19 मुले (आर्टिस्टिक पेअर): रोहन सुधाकर राऊत व हर्षित प्रफुल कोल्हा – प्रथम क्रमांक
U-17 मुले (रिदमिक पेअर): विकीराज लक्ष्मण पवार व गौतम प्रकाश भालसी – प्रथम क्रमांक
U-19 मुले (रिदमिक पेअर): धीरज सुरेश गिंभल व प्रथमेश सुनील वायेडा – प्रथम क्रमांक
U-17 मुले (आर्टिस्टिक सिंगल): दिपेश चंद्रकांत मिसाळ – प्रथम क्रमांक
वरील सर्व विद्यार्थ्यांची निवड आता पुणे विभागस्तरीय योगा स्पर्धेसाठी झाली आहे.तसेच,
U-19 मुले (आर्टिस्टिक सिंगल): संदेश जोगेश धनवा – द्वितीय क्रमांक
U-14 मुले (आर्टिस्टिक सिंगल): तन्मय डोंबरे – द्वितीय क्रमांक
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, प्राचार्य अजित वाघमारे, रोहिणी सावंत, क्रीडा शिक्षक मंडले सर, डोंबाळे सर, दणाणे सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
संस्थेच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाचे नाव जिल्हा पातळीवर उज्ज्वल केले आहे.



0 Comments