बारामती | राजवर्धन शिंदेंच्या प्रयत्नांतून बारामतीत पदवीधर मतदार नोंदणीचा विक्रमी दहा हजारांचा टप्पा, राष्ट्रवादीच्या संघटनशक्तीत भर.

 

बारामती:विजय लकडे

            बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करण्याचा संकल्प फक्त एक वर्षात प्रत्यक्षात उतरवत माजी तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी विक्रमी पदवीधर मतदार नोंदणी करत दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. पक्षाला नवसंजीवनी देणारे नेते म्हणून शिंदे यांचे नाव आता तालुक्यात ठळकपणे समोर येत आहे.





लोकसभा निवडणुकीतील धक्क्यानंतर पक्षामध्ये निर्माण झालेली खिन्नता दूर करण्यासाठी अजितदादा पवार यांनी संपूर्ण संघटनात बदल घडवून आणत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले होते. याच महत्त्वाच्या टप्प्यावर अनेकांची नजर तालुका अध्यक्षपदावर होती; परंतु अजितदादांच्या विश्वासाचे मानकरी ठरून शिंदे यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि सुरुवातीपासूनच जोमाने कामाला लागले.



गावोगावी कार्यकर्त्यांशी संवाद साधत, जुन्या-नव्या नेतृत्वाचा संगम साधत त्यांनी पक्षाला नव्या धर्तीवर उभारी दिली.

विधानसभा निवडणूक असो किंवा छत्रपती सहकारी साखर कारखाना व माळेगाव कारखान्याच्या निवडणुका — शिंदे यांची संघटन कौशल्ये ठळकपणे दिसून आली. पक्षाचा दबदबा कायम ठेवत त्यांनी राष्ट्रवादीचे वर्चस्व मजबुतीने टिकवून ठेवले.



“अजितदादांचे विचार प्रत्येक वाडी–वस्तीपर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय होते. पदाचा मान ठेवत पूर्ण निष्ठा आणि जबाबदारीने काम केल्याचा आज समाधान आहे,” असे शिंदे सांगतात.


त्यांच्या पुढाकाराने बारामती तालुक्यात क्रियाशील सभासद नोंदणीला ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. बारामती तालुक्यात वाडी वस्ती वर विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्ती करताना कार्यकर्त्यांची गुणवत्ता,सामाजिक प्रतिष्ठा बघून नियुक्ती केल्या,त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे बारामती तालुक्यात ‌पदवीधर मतदार नोंदणी दहा हजारांच्या वर नेण्याचा विक्रम घडवून आणत तालुक्यातील राजकीय समीकरणांना नव्या दिशा दिल्या आहेत.

यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मजबुत सामाजिक आणि बौद्धिक आधार लाभणार, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.   


                 अल्प कालावधीत केलेले प्रभावी नेतृत्व, कार्यकर्त्यांशी असलेली आपुलकी आणि संघटन विस्ताराचा दमदार धडाका यामुळे राजवर्धन शिंदे आज बारामती तालुक्यात राष्ट्रवादीच्या नव्या उर्जेचे प्रतिक बनले आहेत.

Post a Comment

0 Comments