बारामती | सोमेश्वर कारखान्यात F.R.P व पहिल्या उचलीवरून वाद तीव्र; शेतकरी कृती समितीची ३५०० ₹ पहिली उचल देण्याची मागणी



सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 

                    सोमेश्वर साखर कारखान्याने २०२५–२६ गळीत हंगामासाठी घोषित केलेल्या ३३०० रुपये प्र.मे.टन पहिल्या उचलीवरून. शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष  सतीश काकडे यांनी या निर्णयाला सभासदांची दिशाभूल करणारा ठरवत ३५०० रुपये प्र.मे.टन प्रमाणे तात्काळ रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी केली आहे



काकडे म्हणाले की, उस गाळप झाल्यानंतर १४ दिवसात F.R.P देणे कायदेशीर बंधनकारक आहे.तथापि, गेली ४ वर्षे कारखाना हा कायदा मोडत असून,सभासदांचे कोट्यवधी रुपये २-३ महिने बिनव्याजी वापरत आहे.


कृती समितीने दाखल केलेल्या न्यायालयीन याचिकेमुळे महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांना F.R.P एकरकमी देण्यास भाग पाडले गेले असून, याचे श्रेय कारखान्याने स्वतःकडे न घेता शेतकरी चळवळीला द्यावे, अशी काकडे यांची भूमिका आहे



काकडे यांनी कारखाना प्रशासनाच्या साखर दरासंबंधीच्या दाव्यालाही चुकीचे म्हटले.कारखान्याला बँकेकडून प्रति पोते ३२४० रुपये उचल मिळते,साखरेची विक्री किंमत ३७२५ रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक आहे,त्यामुळे मागील हंगामातही ३५५० रुपये दर बसू शकत होता.यावरून कारखाना सभासदांना योग्य दर न देत असल्याचे स्पष्ट होते, 

अनुदान जाहीर करण्याची वेळ का आली?

     गेल्या काही वर्षांत उशिराने F.R.P देण्यामुळे सभासदांचा विश्वास कमी झाल्याने, कारखान्याला चालू हंगामातही फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये अतिरिक्त अनुदान जाहीर करावे लागल्याचे काकडेंनी नमूद केले.

“जर वेळेवर आणि योग्य पहिली उचल दिली असती, तर कारखान्यावरचा अनुदानाचा भार पडला नसता आणि जादा ऊसही मिळाला असता,” असे ते म्हणाले.


कृती समितीने कारखान्याला स्पष्टपणे मागणी केली आहे की,“१० डिसेंबरच्या पंधरवड्याचे बिल ३५०० रुपये प्र.मे.टन दराने तात्काळ सभासदांच्या खात्यावर वर्ग करा. F.R.P विलंबामुळे शेतकऱ्यांचे जवळपास ६ ते ६.५० कोटी रुपये व्याज मिळावे, यासाठी दाखल केलेल्या याचिकेची पुढील सुनावणी ८ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.

“या लढाईत लवकरच तमाम उस उत्पादक सभासदांना न्याय मिळेल.

Post a Comment

0 Comments