बारामती | पंचक्रोशीतील टोमॅटो व्यापाराचे जनक नरसिंग बाळू वळकुंदे यांचे वृद्धापकाळाने निधन

 

                     पुरंदर रिपोर्टर LIVE 

खंडोबाचीवाडी (ता. बारामती ) :

                    पंचक्रोशीतील प्रसिद्ध टोमॅटो व्यापारी व स्थानिक व्यापारी वर्तुळात टोमॅटो व्यापाराचे जनक व आप्पा म्हणून ओळख असलेले नरसिंग बाळू वळकुंदे (वय ८२) यांचे आज सकाळी ७:३० वाजता वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले.



नरसिंग वळकुंदे यांनी आपल्या कष्ट, प्रामाणिकपणा व दूरदृष्टीच्या बळावर टोमॅटो व्यापाराला नवसंजीवनी दिली. परिसरातील शेतकरी व व्यापारी यांच्यात ते विश्वासू व मार्गदर्शक म्हणून ओळखले जात.

                         त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व नातवंडे असा मोठा परिवार आहे. सतीश नरसिंग वळकुंदे, माजी सरपंच खंडोबाचीवाडी यांचे ते वडील तर मनिषा सतीश वळकुंदे, माजी सरपंच खंडोबाचीवाडी, यांचे ते सासरे होत.   

नरसिंग वळकुंदे यांच्या निधनाने खंडोबाचीवाडी व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे

Post a Comment

0 Comments