बारामती | विजय लकडे.
बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नगराध्यक्ष सचिन सातव यांनी नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरणपूरक आणि विकासाभिमुख असा संदेश दिला आहे. निवडीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी हार, शाल किंवा बुके आणण्याऐवजी “एक झाड” भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना नगराध्यक्ष सातव म्हणाले की, ही झाडे म्हणजे केवळ भेटवस्तू नसून बारामतीच्या शाश्वत विकासासाठी सर्वांनी मिळून केलेला जिवंत संकल्प आहे. त्यांच्या या आवाहनाला शहरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात रुजताना दिसत आहे.
नगराध्यक्ष सातव यांनी आपल्या यशामागे मार्गदर्शक आणि नेतृत्वाचे योगदान असल्याचे नमूद करत, आदरणीय नेते अजितदादा आणि सुनेत्रावहिनी यांच्या प्रेरणेतूनच आपण सार्वजनिक जीवनात काम करत असल्याचे सांगितले.
“चला, बारामतीला अधिक हिरवीगार आणि समृद्ध बनवूया,” असा संदेश देत नगराध्यक्ष सचिन सत्तव यांनी विकासासोबत पर्यावरण संतुलन राखण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.



0 Comments