पुरंदर रिपोर्टर लाईव्ह
निरा - प्रतिनिधी
नीरा येथील श्रीमती निर्मला तेजमल जैन (वय ८२) यांचे आज सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्या निरा येथील प्रसिद्ध दिनेश मेडिकलचे मालक नरेंद्र (नलूशेठ) जैन यांची मातोश्री होत.
त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ४ वाजता निरा येथील स्मशानभूमीमध्ये होणार असून परिसरात शोककळा पसरली आहे.


0 Comments