पुरंदर | गजराबाई भागुजी दगडे यांचे दुःखद निधन

 

                     पुरंदर रिपोर्टर Live 

 नीरा | प्रतिनिधी

नीरा शिवतक्रार येथील गजराबाई भागुजी दगडे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने नीरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


कैलासवासी भागुजी दगडे पाटील यांच्या त्या पत्नी होत्या. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबूराव दगडे यांच्या त्या भाऊजय तर विद्यमान संचालक विक्रम दगडे यांच्या त्या चुलती होत. दगडे कुटुंबाच्या सामाजिक कार्यामुळे परिसरात त्यांचा मोठा मान-सन्मान होता.





    अंत्यविधी नीरा नदीकाठी वैकुंठ स्मशानभूमी येथे (दिनांक ३ डिसेंबर …) सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे.


त्यांच्या निधनाने दगडे कुटुंबियांसह , नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली असून सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.



Post a Comment

0 Comments