निंबोडीच्या शेतकरीपुत्राची कमाल; लखन शेळके भारतीय हवाई दलात दाखल.

 

                    पुरंदर रिपोर्टर Live 

लोणंद – प्रतिनिधी

        लोणंद (ता. खंडाळा) येथील निंबोडी गावचा अल्पभूधारक शेतकरी पुत्र लखन विलास शेळके  याने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर भारतीय हवाई दलात बहुमानाची भरारी घेतली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल आज लोणंद येथे औपचारिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

        फलटण येथील स्वरूप अकॅडमीमध्ये तब्बल आठ महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करताना, सुरज भिसे (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच प्रयत्नात लखन यांनी हे उल्लेखनीय यश मिळवले. त्यांच्या या कामगिरीने निंबोडी गावाचा मान उंचावला आहे.

        सत्कार प्रसंगी गावातील व परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये दशरथ धायगुडे, किरण गोवेकर, विलास शेळके, नितीन सुळ, आदिनाथ धायगुडे, रोहन धायगुडे, गणेश कोळेकर, अमोल गोवेकर, नवनाथ शेळके, डॉ. प्रताप गोवेकर, अभय गोवेकर, किशोर गोवेकर, गणेश गोवेकर, नारायण गोवेकर, युवराज गोवेकर आदी मान्यवरांचा समावेश होता.

      लखन यांनी प्राथमिक ते दहावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, कळंबोली येथे पूर्ण केले, तर बारावीचे शिक्षण मालोजीराजे ज्युनियर कॉलेज, लोणंद येथे घेतले. त्यांचे वडील शेतकरी, आई गृहिणी असून भाऊही शेतीत कार्यरत आहे.

     भारतीय हवाई दलातील ही निवड संपूर्ण निंबोडी गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून सत्कार सोहळ्यात उत्साह आणि गौरवाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

Post a Comment

0 Comments