सोमेश्वरनगर. प्रतिनिधी.
शिवा काका कारंडे फाऊंडेशने २५ व्या अखंड हरिनाम सप्ताह–ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. रेणुका स्वप्निल कारंडे यांच्या पुढाकाराने सुप्रसिद्ध भारुडसम्राट ह.भ.प. कृष्णा महाराज जोगदंड यांचा भव्य भारुड कार्यक्रम मस्कोबानाथ मंदिर, सदोबाचीवाडी येथे संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती दिसून आली. कृष्णा महाराजांनी त्यांच्या प्रसन्न, विनोदी आणि प्रभावी शैलीतून भजन, अभंग, गौळणी यांच्या माध्यमातून समाजाला अत्यंत महत्त्वाचे संदेश दिले
व्यसनामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबाची व्यथा हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडली तसेच गर्भातील बाळासाठी गर्भसंस्कारांचे महत्त्व सांगत कुटुंबवत्सल समाजाचे आवाहन करत, तरुणांनी अध्यात्माकडे वळावे, जीवन मूल्यमूल्यांनी जगावे असा परखड संदेश त्यांनी दिला.
सुंदर आवाज, विनोदी शैली आणि प्रभावी भारुडामुळे श्रोते क्षणभरही मंत्रमुग्ध झाले या कार्यक्रमासाठी परिसरातून उंचावलेला प्रतिसाद पाहून भक्तीमय वातावरण अधिकच खुलले.
अध्यक्षा सौ. रेणुका स्वप्निल कारंडे यांनी यापूर्वीही सोमेश्वर विद्यालयात समाज प्रबोधनकार श्री. वसंत हंकारे सरांचे व्याख्यान आयोजित करून समाजजागृतीला चालना दिली होती. सातत्याने होत असलेल्या अशा आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमामुळे फाऊंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारुडाच्या प्रभावामुळे कांबळेश्वर गावातील ग्रामस्थांनीदेखील असा कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती फाऊंडेशनकडे केली.
सतत होत असलेल्या अध्यात्मिक कार्यक्रमामुळे संप्रदायातील लोकांचा हि सौ रेणुका कारंडे यांनाच पंचायत समिती साठी तिकीट मिळावे हि मागणी जोर धरत आहे.

0 Comments