बारामती | सोमेश्वर कारखान्यातून ४ वर्षांचे विलंबित FRP व्याज जमा — श्रेय शेतकरी कृती समितीचे, चेअरमनचे नाही : सतिश काकडे

 



सोमेश्वरनगर - प्रतिनिधी 

                              श्री सोमेश्वर सह. साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर ता. बारामती जि. पुणे या कराखान्याने सन २०२१-२२ ते सन २०१४-१५ या चार गाळप हंगामाध्ये FRP रक्कम सभासदांना एक रक्कमी वेळेत दिली नाही. कायदयाने उस तुटल्यापासुन १४ दिवसांमध्ये उसाची एकरक्कमी FRP देणे केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डर १९६६ नुसार बंधनकारक आहे. तसेच विलंबाने दिलेल्या FRP रक्कमेवर १५ टक्के व्याज द्यावेच लागते. परंतु सोमेश्वर कारखान्याने मागील तीन ते चार वर्षामध्ये राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाचा आधार घेवुन बेकायदेशीरपणे केंद्र सरकारच्या आदेशाचा भंग करून कारखान्याने सर्व शेतकरी सभासदांना वेटीस धरून जाणीवपूर्वक कमी पैसे दिले होते. ती रक्कम अंदाजे ६ ते ६.५० कोटी रूपये होत आहे वरील नमुद केलेली आकडेवारी ही वेळोवेळी कारखान्याच्या मिळालेल्या लेखापरिक्षण अहवाला नुसार मिळालेली आहे अशी माहिती मिळते. याबाबत शेतकरी कृती समितीच्या वतीने मी दि. २५/९/२०२५ रोजी मा. हायकोर्ट साहेब यांचेकडे दाद मागीतली. तसेच FRP एक रक्कमी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याचिका दाखल केली होती त्यावर दि. १७/३/२०१५ रोजी मा. हायकोर्ट साहेब यांनी राज्य सरकारने FRP रक्कम दोन हप्त्यात देण्याचा आदेश काढला होता तो रद्द करून केंद्र सरकारच्या कायदयानुमार FRP एकरक्कमी देणे बंधनकारक आहे असानिकाल दिला आहे तसेच विलंबाने दिलेल्या FRP रक्कमेवर १५ टक्केव्याजदराने रक्कम देण्याविषयीही आदेशकेले आहेत.




तसेच साखर आयुक्त यांनाही याचिका कर्त्यांना बोलावुन सुनावणी घ्यावी व केंद्र सरकाराचे आदेशानुसार पैसे देण्यात यावे अशी सुचनाही केली होती. परंतु साखर आयुक्तांनी या कामी अदयाप पर्यंत शेतकरी कृती समितीस सुनावणीसाठी बोलवलेले नाही. दुसरीकडे कारखान्याने राज्य सरकारच्या बेकायदेशीर पत्रकानुसार तसेच कारखान्याच्या लेखापरिक्षण अहवालानुसार गेल्या दोन दिवसात सभासदांच्या खात्यावर विलंबाने दिलेल्या FRP च्या व्याजाची रक्कम जमा केलेली आहे. राज्य सरकारच्या FRP च्या तुकडे करण्याच्या अध्यादेशाशी अनुसरून हे व्याज आकारणी करून कारखान्याने दिलेले आहे.




ती रक्कम दिशाभुल करणारी असुन शेतकरी कृती समितीच्या म्हणण्या नुसार बेकायदेशीरच आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या कायदयानुसारच उर्वरित व्याजाची रक्कम मिळण्याकरीता दि. ८.१२.२०१५ रोजी मा. हायकोर्ट साहेब यांच्या पुढे शेतकरी कृती समितीचे वकील अॅड. योगेश पांडे (पुणे) बाजु मांडणार आहेत. कारखान्याने जी व्याजाची रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा केली आहे. ती केवळ मा हायकोर्ट यांच्या भीतीपोटीच जमा केलेली आहे असे शेतकरी कृती समितीचे म्हणणे आहे व कृती समितीच्या पाठपुराव्यामुळेच सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना कोट्यावधी रूपयांचे व्याज मिळालेले आहे. चेअरमन यांना सोमेश्वरच्या सभासदांची एवढीच काळजी होती तर ४ वर्ष व्याजाची रक्कम देण्यासाठी विलंब का केला तसेच गेल्या वर्षीचा अंतिम भाव (२०२४-२५) चा २०२३-२४ पेक्षा कमी का दिला गेला? माळेगाव कारखान्याने अंतिम भाव जाहिर केला नाही म्हणुन तर सोमेश्वरने १०० ते १५० रू. टनाला कमी दिला नाही ना? वरील बाब दोन्ही कारखान्यांनी संगणमताने तर केली नाही ना? तसेच चालू गळीत हंगामाची एक रक्कमी FRP चेअरमन यांच्यामुळे मिळालेली नसुन मा. हायकोर्ट यांनी राज्य सरकारचे परिपत्रक रद्द केल्यामुळेच मिळालेली आहे हे सभासदांनी लक्षात ठेवावे. 




तरी वरील सर्व बाबींचा चेअरमन त्यांनी खुलासा करावा तसेच कारखान्याने जे व्याज दिले आहे ते अर्धवट दिले आहे व्याजाची रक्कम १५ टक्के प्रमाणे दिलेली नाही त्याकरिता शेतकारी कृती समिती न्यायालयीन लढाई लढत असुन लवकरच त्याचा अंतिम निकाल लागेल व मा. हायकोर्ट साहेब शेतक-यांना न्याय देतील अशी आम्हाला खात्री आहे. सोमेश्वर कारखान्याच्या सर्व सभासदांच्या वतीने पुण्याचे प्रसिध्द वकील अॅड. योगेश पांडे यांचे आभार मानण्यात येत आहेत.



                सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन यांना १२ वर्ष पदावर पुर्ण होत असल्याबाबत वर्तमान पत्रांमधुन एक तप पुर्ण केल्या बाबतच्या बातम्या वाचन्यात येत आहेत, यावर कृती समितीचे असे म्हणणे आहे की या १२ वर्षांमध्ये चेअरमन यांनी सभासदांच्या हिताची काय काय कामे केली ? अलीकडील २ ते ३ वर्षात वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळेस सभासदांना चेअरमन का बोलुन देत नव्हते. कारखान्याच्या किंवा चेअरमन यांच्या विरोधात सभासद बोलत असेल तर स्वतःकडील माईकचे बटन बंद का करत होते. दिपावलीच्या वेळेस कारखाना दुकान लाईनवर बेकायदेशिर पत्रे का लावण्यात आले, त्यांचे लाईटचे कनेक्शन व पाण्याचे कनेक्शन का तोडण्यात आले, या सर्व गोष्टीसाठी तर अजितदादा यांनी आपणाला १२ वर्ष T चेअरमन पदी नेमणुक केली नाही ना? असा प्रश्न शेतकरी सभासदांना पडलेला आहे 

                    मु. सा. काकडे कॉलेज व कारखाना यांच्यात सुरू असलेल्या केस बाबत कारखान्यास दोन वेळा पत्र देवुनही चेअरमन यांनी विशेष सर्व साधारण सभा का घेतली नाही याचाही त्यांनी खुलासा करावा. शेतकरी कृती समितीच्या वतीने शेतकरी सभासदांच्या हितासाठीसोमेश्वर कारखान्याकडुन विलंबाचे व्याज वसुल करणारे महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण आहे.

वरील सर्व बाबी बाबत चेअरमन यांनी विशेष सर्व साधारण सभा बोलविण्यात यावी व या सभेस आपले सर्वांचे नेते मा. अजितदादा पवार यांना ही बोलविण्यात यावे असे अवाहन शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments