someshwarangar : Baramati | राजवर्धन शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वरनगरमध्ये पोलीस भरती ‘स्मार्ट स्ट्रेटेजी’ मोफत कार्यशाळा..!


                 पुरंदर रिपोर्टर LIVE 

सोमेश्वरनगर | प्रतिनिधी 

               सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन राजवर्धन शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णाली अभ्यासिका सोमेश्वरनगरतर्फे ८ डिसेंबर २०२५ रोजी पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्मार्ट स्ट्रेटेजी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा कै. बाबासाहेब शंकरराव गायकवाड संकुल (सोमेश्वरनगर) येथे होणार असून विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे.



        माय अकॅडमी, बारामतीचे संचालक पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या विशेष कार्यशाळेत पोलीस भरतीत ९० टक्के गुण मिळवण्यासाठी अभ्यासाचे नियोजन, सामान्य ज्ञानात २० हून अधिक गुण मिळवण्याचे मार्ग, योग्य पुस्तकांची निवड, मराठी व्याकरण व शब्दार्थ पाठांतराच्या पद्धती, दररोज प्रश्नपत्रिका सोडवण्याचे तंत्र, तसेच चालू घडामोडींची तयारी कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे.





कमीत कमी वेळेत अधिकाधिक अभ्यास प्रभावीपणे कसा करावा यासाठी विद्यार्थी-तरुणाईसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यशाळेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृष्णाली अभ्यासिका, सोमेश्वरनगरचे संस्थापक स्वप्निल गायकवाड यांनी केले आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क : ८७६६०६४४९९

Post a Comment

0 Comments