मदने कुटुंबाचा आदर्श निर्णय; अस्थी विसर्जनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश.

 

                         पुरंदर रिपोर्टर Live .   

 सोमेश्वरनगर | प्रतिनिधी

             पूर्वजांनी घालून दिलेल्या रूढी-परंपरांचा आदर राखत काळानुरूप त्यात बदल करणे आवश्यक असल्याचे मत जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने यांनी व्यक्त केले.

              कुरणेवाडी (ता. बारामती) येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी तंटामुक्ती अध्यक्ष कै. बाळासाहेब महादेव मदने यांच्या सावडण्याचा कार्यक्रम सगोबावाडी येथे पार पडला. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने अस्थी नदीत विसर्जित न करता पर्यावरणपूरक पद्धत स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

              पर्यावरणाचे संरक्षण आणि नदी प्रदूषण टाळण्यासाठी पणदरे विकास मंचाच्या सावित्रीबन परिसरात वडाचे झाड लावून त्या झाडाच्या बुंध्यात अस्थी व राख विसर्जित करण्यात आल्या. वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे झाड वाढवण्याचा संकल्प मदने कुटुंबियांनी केला आहे.

               हा उपक्रम केवळ श्रद्धेपुरता मर्यादित नसून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरला आहे. पारंपरिक रूढींना पर्यावरणपूरक पर्याय देण्याचे प्रेरणादायी उदाहरण मदने कुटुंबाने समाजासमोर ठेवले आहे.

                यावेळी जादूगार शिवम, बापुराव गोरगल, संतोष शेलार, संभाजी चव्हाण, भाऊसाहेब मदने, पुष्कराज गायकवाड, संभाजी गोरगल, धोंडिबा खोमणे, महेश जाधव, बापुराव मदने, नवनाथ वाबळे यांच्यासह मदने कुटुंबिय, नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments