आदर्श पत्रकार पुरस्काराने कृष्णमुर्ती जगताप सन्मानित

 

                पुरंदर रिपोर्टर Live 

बारामती प्रतिनिधी

                दैनिक संध्याच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा आदर्श पत्रकार पुरस्कार बारामती तालुका प्रतिनिधी कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना प्रदान करण्यात आला.

               पुणे येथील नीतू मांडके सभागृहात आयोजित कार्यक्रमात संपादिका ज्योती नाळे, माजी महापौर प्रशांत जगताप, तृप्ती देसाई व नगरसेवक दादा कोद्रे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

               वैद्यकीय मदत, सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments