पुरंदर रिपोर्टर Live
निरा, प्रतिनिधी.
बौद्ध धर्माच्या धार्मिक प्रचार व प्रसारासाठी कार्य करणारे मल्हारी सोनवणे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आज पार पडला; मात्र परंपरागत पद्धतीने पाण्यात विसर्जन न करता कुटुंबीयांनी पर्यावरणपूरक व समाज परिवर्तनाचा संदेश देणारा निर्णय घेत वृक्षारोपण करून त्या वृक्षाच्या बुंध्याशी अस्थी विसर्जित केल्या.
या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बदलाची दिशा देण्याचा प्रयत्न सोनवणे कुटुंबीयांनी केला. या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभाच्या चार जिल्ह्यांतील कार्यकारिणी सदस्य, तालुका व महिला कार्यकारिणी, बौद्ध उपासक-उपासिका तसेच पुरंदर तालुक्यातील बौद्ध समाजबांधव, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व यांच्या वतीने मल्हारी सोनवणे यांनी बौद्ध धम्मासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना मरणोत्तर महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुरस्कार जाहीर करण्यात आला.
निरा परिसरात या उपक्रमाची विशेष चर्चा होत असून पर्यावरणपूरक अस्थि विसर्जनाचा हा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

0 Comments