निरा येथे संत रोहिदास महाराजांची ६४९ वी जयंती उत्साहात. समाजरत्न पुरस्काराने मान्यवरांचा गौरव.

 

                        पुरंदर रिपोर्टर Live.   

निरा, प्रतिनिधी :

             राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा निरा यांच्या वतीने निरा येथील राधाकृष्ण मंगल पॅलेस येथे संत रोहिदास महाराजांची ६४९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात समाज बांधव व भगिनी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम आगवणे यांनी केले. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शशिकांत सोनवणे, डॉ. राम आबने, गुलाब तात्या गायकवाड, मंगेश गायकवाड  अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ.   पुरंदर तालुका अध्यक्ष सागर बागडे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

               समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजक व विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये  कुमारी समृद्धी दादा डोईफोडे, कु.  रेतु तुषार आगवणे, कु. श्रावणी संभाजी टिके, अक्षय आगवणे, राजू देसाई, अथर्व आगवणे, अथर्व टिके याचबरोबर धोंडीबा दगडू आगवणे यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

                कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजू देसाई, (शहर उपाध्यक्ष नीरा) दत्ता कांबळे, सूर्यकांत कांबळे, मिलिंद आगवणे, दिलीप बागडे, अशोक बागडे, सुरज सोनवणे, ऋतिक सोनवणे, राजू गेजगे, गणेश कांबळे, अशोक आगवणे,सोमनाथ पवार, कीर्ती जाधव, मयुरी आगवणे, सुरेखा आगवणे, राखी आगवणे, आरती जाधव, कार्तिकी जाधव, नंदा कांबळे, माधुरी बागडे, अपेक्षा राम, उषा बागडे, पूनम आगवणे आदींनी परिश्रम घेतले.

                 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मंगल आगवणे व वर्षा कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. माधुरी बागडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments