बारामती ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी युवराज खोमणे

पुरंदर रिपोर्टर Live.   

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी.      

बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी युवराज खोमणे तर कार्याध्यक्षपदी राजेश वाघ यांची निवड करण्यात आली. मोरगाव येथे झालेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

या बैठकीत उपाध्यक्षपदी कल्याण पाचांगणे व सुनील जाधव, सचिवपदी गजानन हगवणे, सहसचिवपदी चिंतामणी क्षीरसागर, खजिनदारपदी विजय गोलांडे यांची निवड करण्यात आली. तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी महेश जगताप यांची निवड करण्यात आली. सल्लागारपदी माणिकराव डांगडे पाटील, दत्ता माळशिकारे व जयराम सुपेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

मोरगाव (ता. बारामती) येथील ‘निसर्ग संगीत’ येथे आयोजित सभेत या निवडी पार पडल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे होते. माजी अध्यक्ष ॲड. गणेश आळंदीकर यांनी निवडी जाहीर केल्या.

यावेळी रामभाऊ जगताप, संतोष शेंडकर, दीपक जाधव, संगिता भापकर, विनोद पवार, सोमनाथ भिले, गोरख जाधव, सचिन पवार, मनोहर तावरे, संतोष भोसले आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

दरम्यान, तरडोली येथील पत्रकार संगिता भापकर यांची कन्या अबोली हनुमंत भापकर हिने लेखापरीक्षक परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. तसेच दिवंगत नेते व पत्रकार संघाचे सदस्य विजय मोरे यांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

निवडीनंतर बोलताना अध्यक्ष युवराज खोमणे यांनी सांगितले की, “पत्रकारितेच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देत संघटन अधिक बळकट करण्यासाठी ज्येष्ठ सदस्यांच्या सहकार्याने कार्य करणार आहे.”

Post a Comment

0 Comments