पुरंदर रिपोर्टर Live.
वडगाव, प्रतिनिधी :
साधारणपणे वाढदिवस म्हटला की केक, सजावट आणि मोठा खर्च असे चित्र पाहायला मिळते. मात्र आपण समाजाचं काही देणं लागतो व समाजालाही काहीतरी परत देण्याची भावना जपत इंदापूरचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे बॉडीगार्ड नवनाथ खोडके (रा. वडगाव, ता. बारामती) यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजासमोर आदर्श निर्माण केला.
नवनाथ खोडके यांनी आपल्या सात वर्षांच्या कु. रेणुका नवनाथ खोडके हिचा वाढदिवस बारामती तालुक्यातील मोढवे येथील यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले तसेच शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले.
या आश्रम शाळेत अनेक गोरगरिबांची मुले, मुली शिक्षण घेत आहेत शाळेत राबवलेल्या अनोख्या उपक्रमामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देखीलआनंद खुलला होता. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने या वाढदिवस सोहळ्यात सहभाग घेतला. सामाजिक जाणिवेतून साजरा करण्यात आलेला हा वाढदिवस उपस्थितांच्या मनाला भावणारा ठरला.
या प्रसंगी नवनाथ खोडके, स्वाती खोडके, गणेश खोडके, धीरण पवार, जीवन राऊत, सतीश खुंटाळे, बापू जाधव, गणेश शेलार तसेच श्वेता खोडके व स्नेहल महामुनी आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजाभिमुख पद्धतीने साजरा केलेला हा वाढदिवस परिसरात चर्चेचा विषय ठरला असून इतरांनीही अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम वाढदिवसानिमित्त राबवावेत, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

0 Comments