निरा:प्रतिनिधी.
निरा परिसरातील दगडे वस्ती येथे भरदिवसा शेळ्या चोरीचा धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेत चार शेळ्या, दोन बोकड आणि एक बकरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. या चोरीमुळे शेतकरी राहुल चंद्रकांत वाघमोडे रा.निरा (दगडे वस्ती) यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल वाघमोडे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या गोठ्यातील शेळ्या-मेंढ्यांना पाणी देऊन ते चारा आणण्यासाठी घरी गेले होते. याच दरम्यान सकाळी साडे अकराच्या सुमारास अज्ञात वाहनातून आलेल्या चोरट्यांनी गोठ्यावर डल्ला मारत शेळ्या व मेंढ्या चोरून नेली.
गोठ्याशेजारीलच हॉटेल वरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता यामध्ये स्विफ्ट कार दिसून येत असून यामध्ये चोरी झाल्याचा संशय आहे.
चोरी गेलेल्या जनावरांमध्ये चार शेळ्या असून यातील तीन गाभण शेळ्या गाभण आहेत त्यांची एकूण किंमत सुमारे ५० हजार रुपये आहे. तसेच दोन बोकड सुमारे २० हजार रुपये आणि एक बकरी सुमारे १० हजार रुपये किमतीची असल्याने एकूण ८० हजाराचे नुकसान झाले आहे.
सहसा चोरीचे प्रकार रात्री घडत असताना हा प्रकार भरदिवसा घडल्याने परिसरात आश्चर्य व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे निरा-मोरगाव रोडलगत २४ तास वर्दळ असलेल्या भागात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणी राहुल वाघमोडे यांनी निरा पोलीस चौकीत फिर्याद दिली असून स पो नी संदीप मदने, पोलीस हवालदार हरिश्चंद्र करे, पोलीस पाटील राहुल शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे पुढील तापस निरा पोलीस करत आहेत.

0 Comments