प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रोहित पिंपरी चिंचवड पोलीस दलात दाखल .

पुरंदर रिपोर्टर Live.  

धर्माबाद सोमेश स्वामी.   

                 धर्माबाद (येताळा) येथील रोहित शिवप्रकाश मोकमवार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत पिंपरी चिंचवड पोलीस दलात यशस्वी निवड मिळवून आपल्या जिद्दीचा ठसा उमटवला आहे. आई-वडिलांच्या आधाराशिवाय वाढताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले, तरीही त्यांनी कधीही हार मानली नाही.

                 रोहित यांनी आर्थिक आणि वैयक्तिक अडचणींवर मात करत सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि अढळ आत्मविश्वास यांच्या बळावर हे यश संपादन केले. कोणतीही परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाही, याचा आदर्श त्यांनी आपल्या कर्तृत्वातून घालून दिला आहे.

               


   


               या यशामुळे धर्माबाद परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, रोहित मोकमवार हे अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. “परिस्थिती नव्हे, तर मेहनत आणि आत्मविश्वास यश ठरवतात,” हा संदेश त्यांनी आपल्या यशातून दिला आहे.

                   या यशानिमित्त आयोजित सत्कार समारंभात येताळा गावचे सरपंच तुळशीराम यंगलोड, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्ते मोबीन लाला तसेच गावातील अनेक नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments