सोमेश्वरनगर । एस. डी. सह्याद्री पब्लिक स्कूलचा १००% निकाल कायम; विद्यार्थ्यांचे लखलखीत यश. करंडे ऋषभ सचिन प्रथम (९५%), अनेक विद्यार्थ्यांचा ९०% पेक्षा अधिक गुणांसह झेंडा.

 

पुरंदर रिपोर्टर.  Live

सोमेश्वरनगर.   प्रतिनिधी.   

            समर्थ ज्ञानपीठ संचलित, वाघळवाडी (सोमेश्वरनगर) येथील एस. डी. सह्याद्री पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (CBSE)च्या विद्यार्थ्यांनी २०२५-२६ च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागला असून अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

             या परीक्षेत करंडे ऋषभ सचिन याने ९५.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. गायकवाड आर्या अमोल हिने ९२.६०% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच गायकवाड मानसी कमलाकर (९१.६०%), सांकरे सुमित एकनाथ (९१.००%) आणि खंडाळे संस्कृती राहुल (९१.००%) यांनीही विशेष प्राविण्य मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.




              यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे समर्थ ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, मुख्याध्यापक अजित वाघमारे तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

              या यशाबाबत बोलताना संस्थेच्या पदाधिकारी रोहिणी सावंत, चैतन्य सावंत व धनश्री सावंत यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले आहे.”

              या उल्लेखनीय यशाबद्दल सोमेश्वरनगर परिसरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments