बारामती । "९४ व्या वर्षीही लोकशाहीसाठी पाऊल पुढे; तुकाराम धापटे यांचा मतदानाचा आदर्श”

पुरंदर रिपोर्टर Live.  

विजय लकडे 

           बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा उत्सव गावागावात दिसून आला . या उत्सवात वय हे केवळ एक संख्या असल्याचे दाखवून देत कोराळे बुद्रुक येथील तुकाराम भिकोबा धापटे (वय ९४) यांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

          कोर्हाळे बुद्रुक येथील बूथ क्रमांक २८६ अ येथे त्यांनी स्वतः उपस्थित राहून मतदान केले. वृद्धापकाळातही मतदानाबाबतची त्यांची निष्ठा आणि लोकशाहीप्रती असलेली बांधिलकी पाहून परिसरातील नागरिक अचंबित झाले.

          तुकाराम धापटे हे सुरुवातीपासूनच पवार कुटुंबाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सेवानिवृत्त ग्रामसेवक असलेले धापटे हे पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप (बापू) धापटे यांचे वडील आहेत. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदानही उल्लेखनीय आहे.

           आजच्या तरुण पिढीने मतदानाकडे अनेकदा दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसते. मात्र, ९४ व्या वर्षीही उत्साहाने मतदान करणारे तुकाराम धापटे यांचे उदाहरण हे प्रत्येक मतदारासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या कृतीतून “मतदान हा हक्कच नव्हे, तर कर्तव्यही आहे” हा संदेश अधोरेखित झाला आहे.

Post a Comment

0 Comments