बारामती पोटनिवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात; शेवटच्या दिवशी ३० जणांची माघार, काँग्रेसही स्पर्धेबाहेर.

पुरंदर रिपोर्टर Live 

बारामती, प्रतिनिधी

             दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधना नंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आता अंतिम चित्र स्पष्ट झाले असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण २३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ३० उमेदवारांनी माघार घेतल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला आहे.

             २३ एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतली. विशेष म्हणजे, काँग्रेसनेही या निवडणुकीतून माघार घेतली असून, पक्षाचे उमेदवार आकाश मोरे यांनी पक्षाच्या आदेशानुसार अर्ज मागे घेतला. या पार्श्वभूमीवर निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी काही अपक्ष उमेदवारांकडे लक्ष लागले आहे.

            दरम्यान, युवा नेते जय पवार यांनी आकाश मोरे यांची भेट घेत काँग्रेस पक्षाचे आभार मानल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

            या निवडणुकीत करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकले यांसारख्या उमेदवारांकडे लक्ष लागले आहे. बारामतीची निवडणूक जरी एकतर्फी वाटत असली तरी या उमेदवारांना किती मते मिळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



निवडणूक रिंगणातील प्रमुख उमेदवार :

१) सुनेत्रा अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

२) राघू येताळा घुटुकडे (न्यू राष्ट्रीय समाज पक्ष)

३) सतीश कृष्णा कदम (हिंदुस्तान जनता पार्टी)

४) अभिजीत वामनराव बिचुकले (अपक्ष)

५) अविनाश वामनराव गायकवाड (अपक्ष)

६) करुणा धनंजय मुंडे (अपक्ष)

७) गजानन उत्तम गवळी (अपक्ष)

८) चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)

९) चंद्रकांत सूर्यकांत वाघमोडे (अपक्ष)

१०) दत्तात्रय रावसाहेब बेदरे (अपक्ष)

११) बाळासो मारुती धापटे (अपक्ष)

१२) मिथुन सोपानराव आटोळे (अपक्ष)

१३) मंगलदास निकाळजे (अपक्ष)

१४) योगेश मोहनदास रतेश्वर (अपक्ष)

१५) सोनाली सूर्यकांत राणे (अपक्ष)

१६) रोहित राजू भोसले (अपक्ष)

१७) विजयकुमार रामचंद्र भिसे (अपक्ष)

१८) विराज महादेव शिंदे (अपक्ष)

१९) शिवाजी जयसिंग कोकरे (अपक्ष)

२०) सतीश नाना सोनवणे (अपक्ष)

२१) सागर शरद भिसे (अपक्ष)

२२) साजन भगवान अडसूळ (अपक्ष)

२३) सीताराम विठ्ठल रणदिवे (अपक्ष)

माघार घेतलेले उमेदवार :

संकेत गावडे, गोपाल तंतरपाळे, दिनकर गायकवाड, दादा थोरात, सुवर्णा गायकवाड, अरुण निटुरे, खिजर पिरजादे, विशाल घोरपडे, उमेश म्हेत्रे, दिलीप अळोणी, संतोष कांबळे, सिद्धाराम काकणकी, अनिल तुपे, त्रिशला कांबळे, महेंद्र ताटे, उन्मेश देशमुख, आकाश मोरे (काँग्रेस), मोहन राऊत, संदीप खरात, दशरथ राऊत, त्रिभुवन पद्माकर, प्रतीक्षा चव्हाण, विक्रम कोकरे, अभिजीत कांबळे, विलास होळकर, माऊली कांबळे, रज्जाक मुलाणी, राहुल थोरात, अमोल कोकरे, अशोक खामगळ.


निष्कर्ष :

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या माघारीमुळे लढत सोपी झाल्याचे चित्र दिसत असले तरी अपक्ष उमेदवारांचा प्रभाव आणि मतदानाच्या टक्केवारीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

Post a Comment

0 Comments