धर्माबाद. सोमेश स्वामी.
धर्माबाद येथे दि. 22 एप्रिल रोजी“जातीपाती विसरूनी जाऊ, हिंदू सारे एक होऊया घोषणांनी धर्माबाद शहर दणाणून गेले, निमित्त होते भव्य हिंदू महासंमेलनाचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर धर्माबाद येथे भव्य हिंदू महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या महासंमेलनानिमित्त सायंकाळी पाच वाजता श्री.स्वामी समर्थ केंद्र येथून भव्य दिव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रे मध्ये महिला,युवक, पुरुष व लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. पारंपरिक व सांस्कृतिक वातावरणात कलशधारी महिला,भगवे झेंडे, तसेच देवी-देवतांच्या देखावे श्रीराम,लक्ष्मण, सीता,हनुमान,भारत माता असे अनेक देखाव्यांनी शोभायात्रेला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले. धर्माबाद शहरातील मुख्य मार्गांवरून ही शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
सायंकाळी सात वाजता गुजराती कॉलनी मैदान येथे हिंदू महासंमेलन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत प्रमुख वक्ते इंद्रजीतजी बैस व श्री.स्वामी वेंकटेशाचार्यजी महंत यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी देव, देश,धर्म आणि संस्कृती यांचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन धर्माबाद येथील सकल हिंदू समाज व युवकांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच बाळापूर, रत्नाळी आणि परिसरातील ग्रामीण भागातील युवक व विविध सामाजिक आणि आध्यात्मिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. एकूणच,धर्माबाद येथे पार पडलेले हिंदू महासंमेलन हे उत्साह, एकात्मता आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक ठरले.

0 Comments