सोमेश्वरनगर. प्रतिनिधी.
स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने तसेच विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व आणि कलागुणांना चालना देण्यासाठी “जाणता राजा अजितदादा पवार” या विषयावर तालुका स्तरीय वक्तृत्व व नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वक्तृत्व स्पर्धेसाठी “जाणता राजा अजितदादा पवार” हा विषय देण्यात आला होता, तर नृत्य स्पर्धेसाठी अजितदादांवरील गाण्यांवर आधारित समूह नृत्य ही थीम ठेवण्यात आली होती. लहानग्यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे :
१.प्रथम क्रमांक (विभागून)
वक्तृत्व स्पर्धा – कु. देवांश पाथरकर (जि.प. प्रा. शाळा काटेवाडी)
नृत्य स्पर्धा – जि.प. प्रा. शाळा निंबूत
२.द्वितीय क्रमांक (विभागून)
वक्तृत्व स्पर्धा – कु. शिवांश कारंडे (जि.प. प्रा. शाळा आठ फाटा)
नृत्य स्पर्धा – जि.प. प्रा. शाळा कुरणेवाडी
३.तृतीय क्रमांक (विभागून)
वक्तृत्व स्पर्धा – कु. दुर्वा कोकरे (जि.प. प्रा. शाळा पणधरे)
नृत्य स्पर्धा – जि.प. प्रा. शाळा वाणेवाडी
४.चतुर्थ क्रमांक (विभागून)
वक्तृत्व स्पर्धा – कु. शिवांजली निंबाळकर (जि.प. प्रा. शाळा कुरणेवाडी)
नृत्य स्पर्धा – जि.प. प्रा. शाळा कुदळेमळा
५.पाचवा क्रमांक (विभागून)
वक्तृत्व स्पर्धा – कु. स्वरा बगाडे (जि.प. प्रा. शाळा पणधरे)
नृत्य स्पर्धा – जि.प. प्रा. शाळा चौधरवाडी
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. प्रथम क्रमांकासाठी ₹१०,००१ द्वितीय क्रमांकासाठी ₹५,००१ तृतीय क्रमांकासाठी ₹३,००१ तसेच चौथ्या ते दहाव्या क्रमांकापर्यंत प्रत्येकी ₹१,००१, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, मा. सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ सुरू असलेल्या गाव दौऱ्यादरम्यान या विद्यार्थ्यांनी आपली भाषणे मान्यवरांसमोर सादर केली होती. यावेळी उपस्थित युवा नेते जय पवार व आ. रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या तयारीचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत, “इतक्या लहान वयात मुलांनी अजितदादांचे विचार आत्मसात केलेले पाहून अभिमान वाटतो,” असे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवाकाका कारंडे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षा रेणुका स्वप्नील कारंडे यांच्या नेतृत्वाखाली हा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
यावेळी सोमेश्वरचे चेयरमन पुरुषोत्तम जगताप, ऋषी गायकवाड, शैलेश रासकर, राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष नाना मदने, उपसरपंच रणजित सोरटे, नितीन सोरटे, प्रवीण काळभोर, अनिल गवळी, सोरटेवाडी शाळेचे प्राचार्य लकडे सर यांच्यासह विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रेरणादायी नेतृत्वाच्या विचारांची जपणूक करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.


0 Comments