purandar | माणदेशी ओव्यांवरील पुस्तकाचे रविवारी प्रकाशन डॉ. प्रविण जोशी यांची दोन पुस्तके वाचकांच्या भेटीला..!

 



पुरंदर रिपोर्टर. Live. 

निरा:प्रतिनिधी.  

           ग्रामीण लेखक, कवी आणि संशोधक डॉ. प्रविण जोशी यांचे माणदेशी धनगरी स्त्रीओविगीतातील लोकतत्वाचा शोध घेणारा ‘अनर्घ’  हा संशोधन ग्रंथ पाच वर्षांच्या संशोधनानंतर वाचकांच्या भेटीला येत आहे.  गावागाड्यावर आणि सरकारी घरकुल योजनेवर भाष्य करणारी ‘संजय’ ही रुपांतरीत कादंबरी देखील रविवार (ता. ०७) रोजी प्रकाशित होत आहे. त्यामुळे दोन पुस्तके वाचकांच्या भेटीला एकाच दिवशी येणार आहेत.

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी पशुधन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते अनर्घ या संशोधन ग्रंथाचे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य आणि सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या हस्ते संजय या कादंबरीचे प्रकाशन होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. 

तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले,जेजुरीचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, साहित्यिक कुंडलिक कदम, जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी निवेदिता देशमुख, इतिहास अभ्यासक संतोष पिगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

    कांचनदादा निगडे, वसंतराव मडके, गिरीश बनकर, बाबासाहेब खरात, शेखर खरात, शेखर खताळ, निलेश काशीद आदी संशोधन ग्रंथ तसेच लोकसाहित्यावर भाष्य करणार असून कार्यक्रमाला उपास्थित राहण्याचे आवाहन आयोजक नितीन निगडे, प्रशांत जोशी, अमोल गायकवाड यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments