Purandar | संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली वाल्हे येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश..!


   पुरंदर-वाल्हे : प्रतिनिधि 

                         आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाल्हे पंचक्रोशीतील राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ झाली आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाल्हे ग्रामपंचायत सदस्य , सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब मदने आणि शिवा मदने यांनी आपल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

                            पुरंदर-हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली आणि राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वाल्हे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रभागी असणाऱ्या दादासाहेब मदने यांच्या या भाजप प्रवेशामुळे आगामी वाल्हे ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. या प्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संभाजी नाना काळाने, जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे, माजी पंचायत समिती सदस्य सुनीता काकी कोलते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

 

उपस्थित सर्वच नेत्यांनी दादासाहेब मदने आणि त्यांच्या मित्र परिवाराचे भाजपमध्ये हार्दिक स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस भरीव कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments