सोमेश्वरनगर । रमेश कदम.
वाल्हे (ता. पुरंदर) येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या पालखीचे सांगवी (ता. बारामती) येथे विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी, पक्षीही सुस्वरे आळविती...” या संतवचनांचा भाव जपत निसर्गाच्या सान्निध्यात आणि विठ्ठल भक्तीच्या ओढीने निघालेल्या या पालखी सोहळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व शरयू फाउंडेशन यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी वारकरी बांधवांना सुका मेवा, केळी, बिस्किटे आदींचे वाटप करून सेवाभाव जपण्यात आला.
या स्वागत सोहळ्यास श्री ज्ञानेश्वर पारायण मंडळाचे अध्यक्ष बापूराव सालगुडे, ज्ञानेश्वर तावरे, कोरेगाव (सातारा) पोलीस ठाण्याचे किनेकर साहेब, रहिमतपूरचे केंद्रे साहेब, किसान सेलचे अध्यक्ष मारुती तावरे, संजय तावरे, भाऊसाहेब आडके, तानाजी तावरे, आप्पासो सालगुडे, शरद तावरे, मधुकर देशमुख, नितीन भांडवलकर, दिलीप तावरे, विनय तावरे, सौरभ सराटे, आर्यन काळे, युवक उपाध्यक्ष श्रीकांत तावरे आदी उपस्थित होते.
तसेच आनंदराव धुमाळ, विठ्ठल धुमाळ, उत्तम कांबळे, विनोद कांबळे, बंडा धुमाळ, सतीश धुमाळ, सोमनाथ धुमाळ आणि अभिषेक धुमाळ यांच्या हस्ते वारकरी भाविकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला असून, वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी झालेल्या सर्वांचे भाविकांनी कौतुक केले.


0 Comments