Purander । कृषीकन्यांचा निरा-शिवतक्रार येथे कृषी जनजागृती उपक्रम*


पुरंदर रिपोर्टर Live 

पुरंदर, प्रतिनिधी : 

              डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने निरा -शिवतक्रार येथे शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात  'कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस तंत्रज्ञान' तसेच 'खेती बचाओ' या महत्त्वपूर्ण विषयांवर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संस्थेचे प्रतीक म्हणून रोपटी व बियाणे देऊन ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला. तज्ज्ञांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पीक संरक्षण आणि उत्पादनवाढीबाबत सखोल माहिती दिली.

            कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), बारामती येथील कृषी विस्तार विषय विशेषतज्ञ संतोष गोडसे यांनी 'खेती बचाओ अभियान' या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच कृषी विषय विशेषतज्ञ आकाश वळकुंदे यांनी 'कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस तंत्रज्ञान' या विषयावर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली.



             याच कार्यक्रमांतर्गत रूरल अँग्रीकलचर वर्क एक्स्पिरियन्स  (RAWE) उपक्रमांतर्गत सहभागी ग्रामीण अध्ययन (PRA) उपक्रमही राबविण्यात आला. यावेळी कृषीकन्यांनी गावाचा नकाशा आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून साकारून ग्रामस्थांना गावातील संसाधने, सुविधा व भौगोलिक रचनेची माहिती प्रभावीपणे मांडली. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.

            कार्यक्रमास गावातील प्रमुख उपस्थिती म्हणून मदन चव्हाण, अनिल चव्हाण, ॲड. पृथ्वीराज चव्हाण व रामदास शिंदे,प्रकाश पोकळे,अमोल कदम, उपस्थित होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे डीडी सह्याद्री वाहिनीचे पत्रकार रोहन गवळी यांनी कार्यक्रमाचे वृत्तांकन करून या उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी मिळवून दिली.

             या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे, उपप्राचार्य एस. पी. गायकवाड, प्रा. समीर बुरुंगले, प्रा. पल्लवी पाटील व प्रा. आरती भोईटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

              कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन कृषी कन्या पूजा भागवत, साक्षी गायकवाड, मानसी गाजरे, वैष्णवी जाधव, प्रियांका काळे, आकांक्षा मदने व स्वप्नाली पुजारी यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. उपस्थित शेतकऱ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments