फलटण, प्रतिनिधी :
स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मिरेवाडी (कु.) येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. 'आदर्श ग्रुप मिरेवाडी'च्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात गावातील युवक, ग्रामस्थ, महिला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली.
कार्यक्रमास आमदार सचिन पाटील (फलटण-कोरेगाव), जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर, पंचायत समिती फलटणच्या सभापती कु. शिवांजली भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवान होळकर, पंचायत समिती सदस्य राहुल नरुटे, मिरेवाडीचे सरपंच बापू वाघमारे, ग्रामसेवक अतुल जाधव, कृषी सहाय्यक लोणकर मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. स्व. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख विचारांतून प्रेरणा घेत गावाच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी अशा सामाजिक उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. छोट्याशा मिरेवाडी गावाने या उपक्रमातून पर्यावरणाबाबत समाजासमोर आदर्श निर्माण केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
उपक्रमात रणजित नरुटे, अमोल खारडे, सचिन गाढवे, युवराज सस्ते, विठ्ठल आंबोळे, संदीप नरुटे, बबन नरुटे, जगन्नाथ (आप्पा) नरुटे, नामदेव जगताप, मच्छिंद्र सरक, दिलीप धायगुडे, भिकाजी नरुटे, जगन्नाथ लकडे, गोरख ठोंबरे, सीताराम शेळके, शेखर नरुटे, गोरख मोरे, आप्पासो शेळके, विठ्ठल रुपनवर, आण्णा दडस, पप्पू शेळके, संदीप पिसाळ यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी 'आदर्श ग्रुप मिरेवाडी'च्या कार्यकर्त्यांनी नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत परिश्रम घेतले. अमोल शेळके, निखिल कोरडे, अमोल धायगुडे, राजू दडस, सचिन नरुटे, प्रथमेश (बाबू) धायगुडे, इंद्रजित नरुटे, विकास बरकडे, अक्षय खताळ, सुमित पिसाळ यांच्यासह ग्रुपच्या सर्व सदस्यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. मिरेवाडीत यापुढेही पर्यावरणपूरक, सामाजिक आणि लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार आयोजकांनी यावेळी व्यक्त केला.


0 Comments