सोमेश्वरनगर । रमेश कदम.
स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त वाणेवाडी येथील रामनगर, विकासनगर, चव्हाणवस्ती व दत्तवाडी परिसरातील अंगणवाडीतील एकूण 115 मुला-मुलींना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम अजितदादा युथ फाउंडेशन आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस रोहित भैया यादव मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माऊली पोमणे, शिवसेना बारामती तालुका अध्यक्ष स्वप्निल जगताप, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तुषार सकुंडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे, युवा नेते सूरज (बंटी) बर्गे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बारामती तालुका अध्यक्ष चैतन्य तावरे, युवा उद्योजक हर्षवर्धन जगताप, माजी उपसरपंच सागर चव्हाण, शिवाजी खोमणे, संजय चव्हाण, सोनू सावंत, अनिल काका यादव, आदर्श शिक्षक विलास भिसे हर्षद चव्हाण, संग्राम जगताप, तेजस काकडे, अतुल काकडे, संकेत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी किशोर शेळके यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम परिसरातील नागरिकांनी कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.


0 Comments