Baramati । सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून बारामतीतील १० गावे होणार स्मार्ट व्हिलेज पंचायत समितीत आढावा बैठक.



 पुरंदर रिपोर्टर  Live.  

बारामती रमेश कदम

         हाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील एकूण ७५ गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट व्हिलेज या महत्त्वाकांक्षी पथदर्शी कार्यक्रमात बारामती तालुक्यातील १० गावांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त माध्यमातून केली जाणार आहे.


            बारामती तालुक्यातील पणदरे, मोरगाव, सुपा, वाणेवाडी, मुरूम, पिंपळी, काटेवाडी, गुणवडी, करंजे आणि डोर्लेवाडी या दहा गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर पंचायत समिती, बारामती येथे संबंधित अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि विभागीय अधिकाऱ्यांची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत स्मार्ट व्हिलेज संकल्पनेअंतर्गत गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा, आवश्यक सुविधांचा, मूलभूत पायाभूत सुविधा, स्वच्छता, डिजिटल सेवा, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि शाश्वत विकास यांसंदर्भातील प्राथमिक आराखड्यावर चर्चा करण्यात आली.

          या पथदर्शी योजनेमुळे निवड झालेल्या गावांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध होऊन ग्रामविकासाला गती मिळणार असून, ग्रामीण भागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

Post a Comment

0 Comments