Nimbut । लोकनेते शामकाका काकडे पतसंस्थेचा ९ टक्के लाभांश जाहीर.


पुरंदर रिपोर्टर Live

निरा, प्रतिनिधी :

         लोकनेते शामकाका काकडे दे. नागरी सहकारी पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेच्या सभागृहात उत्साहात पार पडली. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा पतसंस्थेचे चेअरमन राहुल काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.


सन १९८८ मध्ये स्थापन झालेल्या या पतसंस्थेला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त असून, चालू आर्थिक वर्षात संस्थेला सुमारे ४१ लाख२० हजार रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेने सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर केला आहे.




संस्थेने आतापर्यंत ६ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्जवाटप केले असून, संस्थेचे भागभांडवल १ कोटी ४ लाख २० हजार रुपये आहे. पुरंदर तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून संस्थेची ओळख असून, शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणारी तसेच अडचणीच्या काळात सभासदांच्या मदतीस धावून जाणारी संस्था म्हणून लोकनेते शामकाका काकडे दे.नागरी सहकारी पतसंस्थेने नावलौकिक मिळविला आहे.


यावेळी निंबूत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजकुमार बनसोडे, अॅड. आदेश गिरमे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य कांचन निगडे, गुलाबराव कोंडे, अॅड. नारायण भोसले, खंडोबाचीवाडीचे माजी सरपंच धनंजय गरदडे, अरुण फरांदे, सोमनाथ मदने, बाळासाहेब निगडे, प्रकाश फरांदे, कुमार काकडे, विलास काकडे, सामाजिक कार्यकर्ते टी. के. जगताप, अजित मदने, सागर मदने यांच्यासह संस्थेचे  हिशेबनीस वैभव काकडे याच बरोबर सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी सोमनाथ मदने, कांचन निगडे व अॅड. आदेश गिरमे यांनी संस्थेच्या प्रगतीबाबत मनोगत व्यक्त केले. सभेची प्रस्तावना संस्थेचे सचिव विजय लकडे यांनी केली, तर राजकुमार बनसोडे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments