Nira । निरा केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निखिल काकडे; अनिकेत माने उपाध्यक्ष, ऋषिकेश धायगुडे सचिव.

 


पुरंदर रिपोर्टर. Live. 

निरा । प्रतिनिधी. 

           निरा केमिस्ट असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली. यामध्ये निखिल शामराव काकडे यांची अध्यक्षपदी, अनिकेत उत्तम माने यांची उपाध्यक्षपदी, तर पै.ऋषिकेश विलासराव धायगुडे यांची सचिवपदी निवड करण्यात आली.




           नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल निरा परिसरातील केमिस्ट व्यावसायिक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. केमिस्ट व्यावसायिकांच्या अडचणी सोडविणे, संघटनेची एकजूट मजबूत करणे तसेच व्यावसायिकांच्या हितासाठी प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा नूतन पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

            नवनिर्वाचित अध्यक्ष निखिल काकडे , उपाध्यक्ष अनिकेत माने आणि सचिव ऋषिकेश धायगुडे यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments