Baramati । गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अभीजीत देवकाते व मार्तंड देवसंस्थानचा मदतीचा हात.


 पुरंदर रिपोर्टर  Live.  

निरावागज प्रतिनिधी.   

        बारामती तालुक्यातील निरावागज येथील हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अभिजीत देवकाते व श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांच्या वतीने शैक्षणिक मदतीचा हात पुढे करण्यात आला. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीसाठी आर्थिक मदत करण्यात आली.



         या उपक्रमांतर्गत शारदानगर येथे इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या कृतिका कांतीलाल कुंभार या विद्यार्थिनीला १० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच सय्यद इनायत इरशाद, पितृछत्र हरपलेला स्वराज प्रमोद कुंभार, स्वरा ज्ञानेश्वर खरात, शुभ्रा अनिल जाधव आणि अजिनाथ देवकाते या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे धनादेश त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले.

        कुटुंबाची बिकट आर्थिक परिस्थिती आणि मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च या दुहेरी अडचणीत सापडलेल्या पालकांना या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी यापुढेही अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना मदत करत राहणार असल्याचे अभिजीत देवकाते यांनी सांगितले.

          या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिक, पालक आणि सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments