Morgaon । तूर-उडीद पिकांचे प्रशिक्षण; तरडोलीत शेतकऱ्यांना खते व औषधांचे वाटप; प्रगतशील शेतकऱ्यांचा राजेंद्र पवार यांच्या हस्ते सन्मान.


पुरंदर रिपोर्टर Live.  

मोरगाव  प्रतिनिधी.   

             कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या वतीने तूर व उडीद या पिकांच्या उत्पादनवाढीसंदर्भात प्रशिक्षण तसेच शेतकऱ्यांना खते व औषधांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन तरडोली येथील  वडाचा मळा (भैरवनाथ मंदिर) येथे करण्यात आले. या कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन राजेंद्र पवार प्रमुख उपस्थित होते.

यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संतोष करंजे , पोपट गावडे, संतोष गोडसे, कृषी विभागाचे मंडळ अधिकारी बापूराव लोधाडे, तसेच भीमराव लोणकर  उपस्थित होते. तरडोली गावात यापूर्वी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे प्रसाद तावरे  यांचा शेतकऱ्यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.



तसेच गावातील प्रगतशील शेतकरी भारती भापकर, सतीश दरेकर, जनार्दन भोसले, गणपत मासाळ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कृषी क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन बदलांचा स्वीकार करून कमी खर्चात आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, याबाबत राजेंद्र पवार आणि शास्त्रज्ञ संतोष करंजे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तूर पिकाच्या लागवडीपासून उत्पादनापर्यंतच्या विविध बाबी तसेच पीक व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मंगेश खताळ यांनी तूर पिकाबाबतचे आपले अनुभव यावेळी शेतकऱ्यांसमोर मांडले.

कार्यक्रमास तरडोली गावचे प्रशासक महेंद्र तांबे, माजी डीवायएसपी सर्जेराव गाडे तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मंगेश खताळ यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकऱ्यांना आवश्यक खते व औषधांचे वाटप करण्यात आले. तरडोली गावातील शेतकऱ्यांच्या वतीने कृषी विज्ञान केंद्र बारामती, तसेच कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी सर्वांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments