सोमेश्वरनगर रमेश कदम.
निंबुत (ता. बारामती) गावच्या हद्दीत हातभट्टीची गावठी दारू विक्री करणाऱ्या महिला आरोपीविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिसांनी गंभीर कारवाई केली. कोमल प्रमोद नवले (रा. निंबुत) हिला अटक करून न्यायालयीन आदेशानंतर येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
दि. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता निंबुत गावच्या हद्दीत ओढ्याजवळ पत्र्याच्या आडोशाला हातभट्टीची गावठी दारू विक्री व बाळगली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने कारवाई केली असता आरोपीकडून २५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, अंदाजे २,५०० किंमत, तसेच २,१२० रोख रक्कम, असा एकूण ४,७२० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस पथकाची चाहूल लागताच आरोपी महिला घटनास्थळावरून पसार झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला अटक केली.याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. BNS कलम १२३ अंतर्गत १० वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद असल्याने पोलिसांनी या प्रकरणात गंभीर कारवाई केली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी API जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलिस उपनिरीक्षक वारुळे करीत आहेत.


0 Comments