Someshwarnagar। सोमेश्वर चा रणसंग्राम; सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी भाजपची उद्या निर्णायक बैठक!


पुरंदर रिपोर्टर Live. 

सोमेश्वरनगर रमेश कदम

            सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक उद्या, सोमवार (७ सप्टेंबर) रोजी आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता निंबूत येथील युगवीर हॉटेल, निरा-बारामती रोड येथे ही बैठक पार पडणार आहे.

          या बैठकीला भाजपचे प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, सर्व मोर्चांचे अध्यक्ष, आघाडी अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधित जबाबदार प्रमुख उपस्थित राहणार आहेत.




           सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती, निवडणुकीची तयारी आणि पुढील दिशा याबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे सोमेश्वर पंचक्रोशीत राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आयोजक : भारतीय जनता पक्ष, पुणे जिल्हा दक्षिण ग्रामीण व सोमेश्वर पंचक्रोशी.

Post a Comment

0 Comments