पुरंदर : प्रतिनिधि
जेऊर येथील दुर्योधन महादेव धुमाळ (वय ५३) यांचे मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
दुर्योधन धुमाळ हे पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उत्तम (बापू) धुमाळ यांचे कनिष्ठ बंधू होत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच जेऊरसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जेऊर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दुर्योधन धुमाळ यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.


0 Comments