Purander । पुरंदर तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी सुशील गायकवाड.


पुरंदर रिपोर्टर Live.   

सासवड प्रतिनिधी.  

          पुरंदर तालुका नाभिक संघटनेची सर्वसाधारण सभा शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी श्री. आचार्य अत्रे सभागृह, सासवड येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत सुशील शंकर गायकवाड (पिंपरे खुर्द) यांची पुरंदर तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

 संस्थापक अध्यक्ष सुरेश साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस ज्येष्ठ समन्वयक सदस्य मनोज शिंदे, सतीश गायकवाड, नितीन राऊत, पत्रकार दै. पुढारी तसेच डॉ. मनोज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सुशील गायकवाड यांच्यासह संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पुरंदर तालुक्यासह जेजुरी व सासवड शहरातील मोठ्या संख्येने समाजबांधव या कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन मनोज शिंदे व सासवड शहर नाभिक संघटनेच्या वतीने करण्यात आले. नितीन राऊत यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. मनोज शिंदे यांनी आभार मानले.

यावेळी संदीप गायकवाड (अध्यक्ष, नीरा), नंदकुमार काश्वेद, अजित गायकवाड, अमर झेंडे, आदिनाथ गायकवाड, पराग काटकर, गणेश खराडे, हेमंत काशीद यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments