बारामती | वाघळवाडी करांची एक मुखी मागणी, नऊ उमेदवारांपैकी कोणालाही संधी द्या पण वाघळवाडी ला उमेदवारी द्या.

 


वाघळवाडी:बारामती | प्रतिनिधी 

                          वाघळवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  या पक्षाची जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये इच्छुक असलेल्या सर्व च्या सर्व ९ उमेदवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे  मुलाखतीच्या वेळी एक मुखाने आमच्यापैकी कोणालाही संधी द्या पण आमच्या गावाला यावेळेस जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी द्या अशी मागणी केलेली आहे. 

                              वाघळवाडी गावाला आत्तापर्यंत इतिहासात जिल्हा परिषद व पंचायत समिती या ठिकाणी कधीच नेतृत्व करायची संधी मिळालेली नाही तसेच इतर ठिकाणी सोमेश्वर कारखाना, बारामती दूध संघ, बारामती खरेदी विक्री संघ, बारामती दूध संघ, निरा विक्री खरेदी पुणे जिल्हा बँक बारामती सहकारी बँक व इतर कोणत्याही ठिकाणी आजपर्यंत  वाघळवाडी गावाला इतिहासात कोणालाही कोणत्याही स्वरूपाची तालुकास्तर अथवा जिल्हा स्तरावरती काम करण्याची संधी मिळालेली नाही. 

तरी गावातील सर्व ग्रामस्थांनी व सर्व उमेदवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुलाखतीच्या वेळी एक मुखाने मागणी करत जिल्हा परिषद व पंचायत समिती या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून वाघळवाडी गावाला मागणी उमेदवारांपैकी कोणालाही एकाला संधी द्या अशी मागणी केलेली आहे. 

मागणी केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे  बारामती तालुका उपाध्यक्ष सतीश सकुंडे,  सरपंच हेमंत गायकवाड, उपसरपंच तुषार सकुंडे, समर्थ ज्ञानपीठ अध्यक्ष अजिंक्य सावंत, माजी उपसरपंच जितेंद्र सकुंडे  माजी उपसरपंच गणेश जाधव, माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष विजय सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका महिला कार्याध्यक्ष सुचिता साळवे व जमीर अत्तार. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी वाघळवाडी गावाला जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी उमेदवारी संधी देणार आहेत की नाहीत हे मोठा उत्सुकतेचा विषय आहे.

वाघळवाडी गावाला गेल्या ५ वर्षांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सोमेश्वर पंचक्रोशी साठी शंभर बेड हॉस्पिटल ८० कोटी, जनजीवन पाणीपुरवठा योजना२४ कोटी, वन सुविधा करणे २.५ कोटी, प्राथमिक आरोग्य केंद्र ४.५ कोटी  व वाघळवाडी ग्रामपंचायतला विकास कामांसाठी आत्तापर्यंत जवळपास १० कोटीच्या वरती निधी आलेला आहे. त्यामुळे वाघळवाडी कर कामांवर ती समाधान व्यक्त करत आहेत व अजितदादांचे  ऋण ही व्यक्त करत आहेत. 

ग्रामस्थ फक्त एकच इच्छा बोलत आहेत की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाघळवाडीकरांना यावेळेस तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीची उमेदवारीची मागणी करत आहेत व ती इच्छा फक्त अजितदादाच पूर्ण करू शकतात असे गावातील ग्रामस्थ बोलत आहेत.


Post a Comment

0 Comments