पुरंदर रिपोर्टर Live
सोमेश्वरनगर. प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर - येथील मु.सा. काकडे महाविद्यालयाचा विद्यार्थी मयूर तानाजी येळे याची दिनांक १५/०२/२०२६ रोजी महर्षी दयानंद विद्यापीठ रोहतक हरियाणा येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात निवड झाली. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सतीशराव काकडे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे , सचिव सतीश लकडे यांनी त्याचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी त्याचे अभिनंदन करून या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासाठी अखिल भारतीय स्तरावरुन पदक मिळवून आणण्यासाठी त्याला विशेष प्रोत्साहन दिले. प्रा. दत्तराज जगताप व प्रा. डॉ. बाळासाहेब मरगजे यांचे त्याला विशेष मार्गदर्शन लाभले.

0 Comments