चौधरवाडी जिल्हा परिषद शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दिमाखात.


पुरंदर रिपोर्टर Live .    

सोमेश्वरनगर.  प्रतिनिधी.  ‍   

              सोमेश्वरनगर चौधरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते; मात्र यावर्षीचा सोहळा शालेय इतिहासात प्रथमच इतक्या दिमाखदार स्वरूपात साजरा झाल्याने ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

             कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पापळ, मुख्याध्यापिका सौ. एस. बी. बालगुडे, तसेच सौ. एस. एस. खामकर यांनी विशेष परिश्रम घेतले.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. तसेच चौधरवाडी चे लोकनियुक्त सरपंच शशांक पवार यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

               कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. दमलेल्या बाबांची कहाणी या गीतावर महिला मंडळी भावुक झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. विशेष आकर्षण ठरले ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील बालचमू. या सादरीकरणाने उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला. तसेच ‘अजितदादा’ यांच्यावर सादर करण्यात आलेल्या गीतावर संपूर्ण गाव भारावून गेले.

             या सोहळ्यास सरपंच शशांक पवार,,‘पुरंदर रिपोर्टर’चे संपादक विजय लकडे, उपसरपंच राहुल चौधरी, ‘सोमेश्वर माझा’चे संपादक चंद्रजित काकडे, रील स्टार कालिदास गरुड,मुख्याध्यापिका सौ. एस. बी. बालगुडे, सौ. एस. एस. खामकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत पापळ तसेच गावातील प्रमुख राजकीय पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments