निंबूत येथील मुस्लिम बांधवांचा भावनिक निर्णय; अजितदादांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर ईद साधेपणाने साजरी होणार.

 

                      पुरंदर रिपोर्टर Live.   

सोमेश्वरनगर.    प्रतिनिधी.   

                राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुःखद आणि धक्कादायक निधनाच्या पार्श्वभूमीवर निंबूत येथील मुस्लिम बांधवांनी येणारी रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचा भावनिक निर्णय घेतला आहे. निंबूत येथील अहले सुन्नत-वल जमातच्या वतीने मस्जिदमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

                अजित पवार हे बारामती तालुक्यातील सर्व समाजाला आपले कुटुंब मानणारे, सर्वांना समान न्याय देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण बारामती तालुक्यावर शोककळा पसरली असून निंबूत येथील मुस्लिम समाजानेही आपल्या कुटुंबप्रमुखाला गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यांच्या स्मृतीप्रती आदर व्यक्त करत यंदाची रमजान ईद कोणताही जल्लोष न करता साध्या आणि शांत वातावरणात साजरी करण्याचा निर्धार मुस्लिम बांधवांनी व्यक्त केला आहे.

                   या संदर्भात निंबूत येथील मस्जिदमध्ये  बैठक घेण्यात आली. बैठकीत समाजातील प्रमुख पदाधिकारी व नागरिकांनी अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली व ईद साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला.

                   या बैठकीस तोफिक सय्यद, जुम्मन सय्यद, मोहसीन सय्यद, अन्वर पठाण, अजीम कुरेशी, जावेद शेख, आमीन सय्यद, सत्तार शेख, यासीन शेख, अल्ताफ शेख, दिलावर सय्यद, राजू सय्यद आदी समाजबांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments