Baramati | प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कामात हलगर्जीपणा उघड.साईड पट्टी न भरल्याने वाघळवाडीत अपघात.

 

सोमेश्वरनगर | प्रतिनिधी.  

              प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा ३ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील पॅकेज क्र. MH-२३१३६ मधील प्रजिमा-६८ सोमेश्वर कारखाना ते वाघळवाडी-कन्हेरवाडी-गडदरवाडी या मार्गावरील रस्त्याच्या कामात गंभीर त्रुटी आढळून आल्या असून यामुळे वाघळवाडी येथे याच रस्त्यावर कांद्याने भरलेली पिकअप पलटी झाल्याची घटना घडली आहे .

सदर रस्त्याची साईड पट्टी नियमानुसार न भरल्यामुळे तसेच रस्त्याला आवश्यक ती रुंदी न दिल्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि लहान वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत असून याच निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

या घटनेमुळे संबंधित ठेकेदार व काम पाहणाऱ्या यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामस्थांकडून रस्त्याचे काम तातडीने दुरुस्त करून साईड पट्टी भरण्याची आणि नियमानुसार रुंदी देण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments