पुरंदर रिपोर्टर Live.
पाटस . प्रतिनिधी.
दौंड तालुक्यातील पाटस येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या फलकाची अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त होत असून दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आज पोलिस उपमुख्यालय बऱ्हाणपुर-बारामती येथे अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेले मा. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी संबंधितांचे लेखी निवेदन स्वीकारले.
जय मल्हार क्रांती संघटना राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या आदेशानुसार तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन सादर केले. यावेळी संबंधितांनी दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
या घटनेमुळे पाटस परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने तातडीने तपास करून आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

0 Comments