जयपाल दगडे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान; समाजकार्यासाठी गौरव.


पुरंदर रिपोर्टर Live.  

पुणे.  प्रतिनिधी.  

                महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित “डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव पुरस्कार २०२६” सोहळा पुणे येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.

               या सोहळ्यात रविभाऊ लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका) यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. स्त्री शक्ती जागरण मंच महिला संघटनेच्या वतीने, मा. सौ. सुनिताताई अडसुळे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.



               समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले, ही निश्चितच अभिमानास्पद व प्रेरणादायी बाब ठरली.

              यावेळी पुरंदर तालुक्यातील निरा येथील जयपाल दगडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव पुरस्कार २०२६” देऊन सन्मानित करण्यात आले. जयपाल दगडे हेआपत्ती व सुरक्षा व्यवस्थापन  महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही दुर्घटना घडली किंवा आपत्ती आली उदाहरणात पूर, दरड कोसळणे रोड अपघात रेल्वे अपघात तसेच केमिकल अपघात कोणत्याही आपत्ती काळात *जीवरक्षक* म्हणून मदत करण्यास कायमस्वरूपी पुढाकार घेतला आहे, आतापर्यंत केरळ, उडीसा, उतराखंड,  कोकण, मुंबई, लोणावळा व सोलापूर या भागात कायम रेस्क्यू ची कामे केलेली आहेत. याच अनुषंगाने त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या याकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल आयोजकांचे देखील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments